March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.12)- वाळूज येथील पारदे पाटील यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या कारचालका विरुद्ध वाळुज पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.12 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील बाबासाहेब सजनराव पारदे (वय 60 वर्षे) हे बुधवारी (ता.10) दुपारी 1 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20, डी आर -2975) वरून दहेगाव (बंगला) कडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वाळूजकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला स्विफ्ट कार (एम एच 22, एस 1999) च्या चालकाने भरधाव येऊन जोराची धडक दिली.

रहीमपूर फाटा येथे झालेल्या या अपघातात बाबासाहेब पारदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना किरण बाबासाहेब पारदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान पारदे यांचा सायंकाळी 7.35 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

या अपघाताप्रकरणी ज्ञानेश्वर बाबासाहेब पारदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कार (एम एच 22, एस 1999) च्या चालका विरुद्ध शुक्रवारी (ता.12 रोजी वाळुज पोलीस ठाण्यात कलम 279, 337, 338, 304 (अ) 427 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *