
वाळूज महानगर, (ता.9)-वाळूज येथील धनगर गल्लीत राहणारे 85 वर्षीय वृद्ध इसम कोणास काही न सांगता रविवारी (ता.7) रोजी निघून गेल्याने ते हरवल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गयाबाई विष्णु पवार रा.धनगर गल्ली वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर ही महिला वाळुज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक येथे W97 कंपनीत नोकरी करते. तिचे वडील विश्वनाथ बापुराव सांगुळे वय 85 वर्ष हे सुमारे 5 वर्षापासुन तिच्याकडेच वाळूज येथे राहावयास होते. रविवारी (ता.7) रोजी सकाळी 8 वाजता ती ड्युटीला गेली तेव्हा वडील हे घरीच होते. त्यानतंर सायंकाळई 5.30 वाजता ती घरी आली तेव्हा वडील हे घरी नव्हते. त्यामुळे तिने वडीलांना गावात विठ्ठल मंदीर तसेच त्याच्या ओळखीचे लोकांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, बाबा 12 वाजेपर्यंत घरीच होते. त्यानतंर गावात, रिक्षा स्टॅन्ड तसेच नातेवाईकांना फोन करुन वडील आल्याबाबतची माहिती विचारली असता त्यांनी आमच्याकडे आले नाही. असे सांगितल्याने त्याचा आजुबाजुच्या परिसरात नातेवाईक व इत्तर ठिकाणी शोध घेतला. ते मिळुन आले नाही. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भीमराव शेळके हे त्यांचा शोध घेत आहे. त्याचे वर्णन असे – नाव विश्वनाथ बापुराव सांगुळे वय 85 वर्ष रा, धनगर गल्ली वाळुज, उंची 5.2 इंच, रंग सावळा, चेहरा-गोल, अंगात पांढऱ्या रंगाचा नेहरु शर्ट, धोतर, डोक्यात राखाडी रंगाची थंडीची टोपी, पायात सुती बुट, हातात काठी, भाषा मराठी बोलतो.
