March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – कंपनीत काम करत असतांना मशिनमध्ये अडकुन एका 18 वर्षीय कामगाराची करून वगळता सर्व बोटे तुटली. घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील बालाजी इंटरप्राईजेस या कंपनीत शुक्रवारी (ता.5) रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल दिलीप राठोड रा. पंढरपुर हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी स्केटर 234 येथील बालाजी इंटरप्राईजेस या कंपनीत अस्थायी कामगार म्हणून काम करत होता. साहेब हा नेहमी प्रमाणे शुक्रवारी (ता.5) रोजी सकाळी कंपनीत कामासाठी गेला होता. साहिल यास मशिनचे ज्ञान नसतांना सुध्दा कंपनीचे व्यवस्थापक आंनद शिंदे व ठेकेदार मनोज राठोड यांनी त्याला मशीनवर काम करायला लावले. मशीनवर जॉब कटींग करत असतांना अचानक डाव्या हातावर मशिन पडल्याने हाताची करंगळी वगळता बाकी होते तुटली. त्यामुळे जखमी झालेल्या साहिली आला मॅनेजर व ठेकेदार यांनी बजाजनगर येथील बालाजी जिवनज्योती हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मॅनेजर व ठेकेदार यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *