
वाळूजमहानगर, (ता.9) -मैत्रीणीकडे जेवायला गेलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे काणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आम्ही दाखवून अपहरण केले. ही घटना शनिवारी (ता.6) रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शनिवारी (ता.6) रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास मैत्रीणीकडे जेवायला जाते. असे म्हणून घरातून निघुन गेली. बराच वेळ झाला तरी ती घरी आलीच नाही. म्हणून तीच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती मैत्रिणीच्या घरी आली नसल्याचे तीच्या मैत्रीणी सांगितले. त्यानंतर तीच्या कूटूंबियांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे खात्री झाली की, तिचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी तिला कशाचेतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
