March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.1) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील चिऊ काऊ बाल संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय.जी. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 गजानन विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती.


या स्पर्धा वयोगट 17 वर्षाआतील मुलं व मुली यांच्यामध्ये झाली. यात मुलांमध्ये एकूण 15 संघांनी तर मुलींमध्ये एकूण 6 संघाने सहभाग नोंदविला. मुलांमध्ये अंतिम सामना श्री गजानन विद्या मंदिर विरुद्ध सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन या दोन संघांमध्ये झाला. सामन्याचा स्कोर 2.0 श्री गजानन विद्यामंदिरने हा सामना एकतर्फी जिंकला. आणि आणि मुलीमध्ये अंतिम सामना शारदा मंदिर विरुद्ध श्री गजानन विद्या मंदिर सामन्याचा स्कोर 2.0 नी श्री गजानन विद्यामंदिर विजयी झाला. मुलींमध्ये बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल तृतीय क्रमांक आला आहे. विजयी संघाला ट्रॉफी मेडल व रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी पंच म्हणून सनी शेख व अंकुश हगोने यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय.जी. जाधव, वाळुज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, इपका कंपनीचे एच.
आर. प्रमुख व्यंकट मैलापुरे, सचिव हरीश जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मशनाजी शिनगारे, विभाग प्रमुख संजय तुपे, बसवंतराव प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, माध्यमिक मुख्याध्यापक बी.व्ही. शिरसाठ, प्राथमिक विभाग प्रमुख शहाजी मंगनाळे, दीपक कोळी, दीपक पठारे, पुजा गिरी, मनीषा नवथर, हणमंत जाधव, संदीप हिंगणकर, प्रल्हाद मंगनाळे, क्रीडा शिक्षक जब्बार पठाण उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *