May 9, 2026


वाळूजमहानगर, (ता.12)- क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशाच्या जडणघडणेत मोठे योगदान दिले. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी सामाजिक कार्य केले. फुले दांपत्याचे शैक्षणिक, सामाजिक कार्यामधील योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. असे प्रतिपादन बजाजनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आमदार संजय शिरसाट यांनी केले.


याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, सरपंच सुनील काळे, शहरप्रमुख श्रीकांत साळे, उपसरपंच ज्योती साळे, हर्षदाताई शिरसाट, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव, सचिन मिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य राजेश साळे, उपजिल्हासंघटक जयश्री घाडगे, तालुकासंघटक उषा हांडे, मोहिनी ढमढेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शिरसाट म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती साजरा करण्यामागचा उद्देश त्यांनी केलेले कार्य व त्यांचे लोककल्याणकारी विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचावे हा असतो. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बजाजनगरात महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दांपत्याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मला अभिमान आहे. फुले दांपत्यांनी देशात शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले असून, 50 टक्के लोकसंख्या असलेल्या महिला माता-भगिनींना फुले दांपत्यांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यामुळे आज देशात सर्वोच्च पदावर महिला कार्यरत आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या एक पाऊल पुढे महिला कार्य करत आहे. हे सर्व फुले दाम्पत्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे पालन करावे. असे आवाहन आमदार शिरसाट यांनी केले.
कार्यक्रमाला विभागप्रमुख राजन सोमासे, पोपटराव हांडे, मंगेश जाधव, राम पाटोळे, शषिकांत ढमढेरे, कारभारी जाधव, अशोक लगड, ग्रामपंचायत सदस्य राणीताई पाटोळे, माधुरी सोमासे, सुनीताताई साळे, छायाताई प्रधान, पुनम भोसले, सुरेखाताई लगड, विष्णू उगले, रमाकांत भांगे, संतोष नरोडे, सचिन प्रधान, योगेश साळे, संभाजी चौधरी, संदिप आढाव, ज्ञानेश्वर गायकवाड, अंकुश पुंड, अल्का शेवाळे, बबन सुपेकर, राजेश कसुरे, ईश्वर जाधव, सुरेश गाडेकर, निलेश जाधव, प्रकाश भोसले, सुनंदा कुदळे, अविनाश सोनटक्के, सतीश पाटील आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *