May 9, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा सिडको वाळूज महानगरच्या वतीने मोफत उच्च रक्तदाब तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रायगड जिल्ह्यात झालेल्या ईरशाळवाडी घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सिडको वाळूज महानगर 1 मधील एमजीएम आरोग्य केंद्र व उपशहरप्रमुख दत्तात्रय वर्पे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत उच्च रक्तदाब तपासणी व उपचार शिबिर गुरुवारी (ता.27) रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजे दरम्यान आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा व आपले आरोग्य सुदृढ निरोगी कसे राहील याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *