November 11, 2026

वाळूज महानगर – राहते घरी आई वडिलांसोबत झोपलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका संशयित तरुणाने अपहरण केले. ही घटना सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 ते 11:45 वाजता दरम्यान वाळुज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शे.पु.) गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील स्वाती गोकुळ डोंगरे वय 14 वर्ष 2 महिने ही सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी राहते घरी झोपली होती. रात्री 11:30 ते 11:45 वाजच्या दरम्यान कोणाला काही एक न सांगता ती राहत्या घरातुन निघुन गेली. तिचा आजुबाजुला रांजणगाव भागात शोध घेतला. परंतू अद्यापही ती मिळुन आली नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की, स्वाती हिस सचिन राठोड रा. गांधीनगर रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर याने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेल्याचा संशय आहे. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 137 (2) बिएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण झालेल्या मुलीचे वर्णन असे –
नाव – स्वाती गोकुळ डोंगरे वय 14 वर्ष रा. रांजणगाव (शे.पु.) उंची 5 फुट, रंग – गोरा, सडपातळ बांधा, नाक-सरळ, चेहरा- गोल, केस- काळे, बॉब कट, भाषा मराठी, हिंदी बोलते, अंगावर काळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगीज.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *