
वाळूजमहानगर, (ता.6) – मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जॉब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला हाताचापट्याने, लाकडी दांड्याने व लाथांनी बेदम मारहाण केली. ही घटना जोगेश्वरी येथे बुधवारी (ता.5) रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील 14 वर्षीय मुलगी, आई, वडील, भाऊ व बहिणीसह भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खाजगी नोकरी करतात. मंगळवारी (ता.4) रोजी नववीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांनी तीला अश्लिल हातवारे करीत तीचा पाठलाग करत असल्याचे तीने घरी आल्यानंतर सांगितले. तिची आई घराबाहेर आली असता तिघेही पळुन गेले. बुधवारी (ता.5) रोजी अंदाजे 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास 14 वर्षीय मुलगी घराचा ओटा झाडत असताना निलेश दुबिले, ऋशीकेष दुबिले, प्रतीक राजुपत हे तीला पाहुन ‘ये शुक शुक’ असा आवाज देऊन तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य केले. याबाबत त्यांना विचारणा केली असता, तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथाने व डोक्यात काहीतरी मारून जखमी केले. वडिलांनाही ते तीघे मारत असताना तेथे प्रविण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतिश काजळे हे भांडण सोडवण्यास आले, तेव्हा त्या तिघांनाही हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. त्या तिघांसोबत आणखी काही मुले असण्याचा संशय आहे. कारण मारहाण करीत असताना तेथे लोकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://youtu.be/EXdwkpThEWk?si=-IUcLtflCDNlsXc3
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल –
दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आख्या कुटुंबालाच आरोपी मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
