August 6, 2026

वाळूज महानगर, (ता 3) – हरसिद्धी रास दांडियातर्फे नवरात्र उत्सवा निमित्त हर्सूल येथे 28 व 29 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुरुष व महिलांचे मिळून एकूण 60 भजनी संघ सहभागी झाले होते.

“जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या जन्मी विठ्ठले कृपा केली” या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अभंगातील ओविप्रमाणे भजन स्पर्धेतील पुरुष गटात वाळूज महानगरातील जोगेश्वरी (तालुका गंगापूर) येथील श्री कानिफनाथ वारकरी भजनी मंडळ प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी उत्साहात झाला.

यावेळी जोगेश्वरी येथील मंडळाचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. श्री कानिफनाथ भजनी मंडळात संघप्रमुख – संजय सोमवंशी, सोमीनाथ वाघ, सुरेश करंडे, बाजीराव काजळे, सर्जेराव दुबिले, कार्तिक दुबिले, जगन बल्लाळ, मृदुंगाचार्य – कार्तिक पडूळ यांनी सहभाग घेतला.

About Author

2 thoughts on “जोगेश्वरीचे भजनी मंडळ ठरले जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचे मानकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *