November 5, 2026

वाळूज महानगर – एकाच वसाहतीत राहणाऱ्या चार जणांनी संगणमत करून त्याच वसाहतीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून चाकू मारून जखमी केले. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णनगर रांजणगाव (शेणपुंजी) येथील बावीस वर्षीय वैश शमशेद सिद्धकी याला आरोपी दीपक वाघमारे, शिवा वाघमारे, विठ्ठल वाघमारे, दत्ता केणेकर यांनी शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली व पोटावर चाकुने मारून जखमी केले. 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास कृष्णनगर रांजणगाव येथे झालेल्या या घटनेप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *