May 9, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – महाराष्ट्र शासनाने औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजना या क्षेत्रात मागील 3 वर्षात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज कंपनीला 2023 चा नारायण मेघाजी लोखंडे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून धोकादायक व धोकादायक नसणारे कारखाने असे 2 गट करण्यात आले होते. या गटामध्ये 250 पर्यंत कामगार असणारे कारखाने, 251 व 400 पर्यंत कामगार असणारे कारखाने, 501 ते 1000 पर्यंत कामगार असणारे कारखाने व 1000 पेक्ष्या ज्यास्त कामगार असणारे कारखाने अशा चार प्रवर्गातून नामांकन मागवण्यात आले होते. राज्यस्थरीय समितीपुढे संबंधित कारखान्यातील सुरक्षा आरोग्य व कल्याणकारी योजना याबाबत केलेल्या उल्लेखनीय कामासंबंधीचे सादरीकरण केले.

सादरीकरणानंतर राज्यस्थरीय समितीने घोकादायक असलेले कारखाने गट क्रं. 1 प्रवर्ग (250 पर्यंत कामगार असणारे कारखाने) या वर्गामध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडला तृतीय परस्काराकरिता निवड केली होती.  गुरुवारी (ता.27) रोजी मुंबई येथील नेस्को हॉल क्रं. 4 पश्चिम गोरेगाव येथे हा पुरस्कार वितरण समारंभ झाला.

यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य महाराष्ट्र राज्य मुंबईचे प्रभारी संचालक एम.आर. पाटील, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगरचे राम दहिफळे व उपसंचालक म.य.भालेकर यांच्या उपस्तितीत इप्का लॅब.ला कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी इप्काच्या वतीने युनिट हेड संजय चौबे, कॅर्पोरेट सेफ्टी हेड एम. के.मित्तल, इप्का लॅब.चे डॉ. व्यंकट मैलापूरे, अजिनाथ सुरवसे, एकनाथ पवार व आकाश पुंड उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *