
वाळूज महानगर, (ता.6) – सहजापूर येथील एका ग्रामपंचायत सदस्यांची कार दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी दगडफेक करून फोडली. ही घटना सोमवारी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाळूज परिसरातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहजापूर ग्रामपंचायतचे सदस्य हरिभाऊ बुरंगे हे स्वस्तिकनगर मध्ये कुटुंबासह राहतात. बुरंगे यांनी त्यांची व्हॅगनार ही कार (एम एच 20, जी क्यु -7962) नेहमीप्रमाणे त्यांनी घराजवळ उभी केली होती. सोमवारी 5 जानेवारी रोजी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात टवाळखोरी व गुंड प्रवृद्धीच्या लोकांनी दगडफेक करून व्हॅगनार कारची पाठीमागील काच व समोरील हेडलाईट फोडून नुकसान केले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. मात्र दुचाकीचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने आरोपींचा शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी हरिभाऊ बुरांगे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन निवेदन दिले आहे. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्यांची कार फोडल्याने वाळूज परिसरात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Lodibetcom is one of the best sites I have been to. There are so many betting options to choose from. Check them out at lodibetcom.