March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.20)- श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे. पुं.) येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यात प्रथम रांजणगाव गावात लेझिम पथकाचे संचालन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला अभिवादन करुन शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमचे उत्कृष्ट कवायती सादर केल्या. शाळेच्या वतीने छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवाजी विद्यालयातील सेवा ज्येष्ठ शिक्षक भगवान किसनराव वनारसे यांना शिवश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन देवगिरी महाविद्यालय येथील इंग्रजी विषयाचे प्रा.डॉ.बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पाहुणे शाळेचे शालेय समिती सदस्य सोमनाथ हिवाळे, केशव पाटील नंदनवणकर, द्वारकादास शामकुमारचे संचालक सदाशिव जाधव पाटील, स्टेपिंग स्टोन इंग्लिश स्कूल चे प्रा.डॉ. दिलीप जाधव, पर्यवेक्षिका सरोज पवार, शिवश्री पुरस्कार प्राप्त भगवान वनारसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमा आडे यांनी केले. यावेळी शाळेच्या वतीने दिला जाणारा शिवश्री पुरस्कार भगवान किसनराव वनारसे यांना पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवकुमार होनराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावरीलअनेक मुद्दे व घटना सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. बाळासाहेब शिंदे यांनी जगात छत्रपती शिवरायाप्रमाणे अनेक राजांनी किल्ले जिंकले, युद्ध जिंकले, शत्रूचा नायनाट केला. परंतु जयंती फक्त शिवरायांचीच होते. कारण इतर राजे, महाराजे, बादशहा लढले स्वतःच्या साम्राज्यासाठी. आणि शिवराय लढत होते रयतेच्या राज्यासाठी म्हणून जगात शिवरायांची जयंती साजरी होते. असे सांगून अनेक घटनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा.डॉ. दिलीप जाधव यांनी कविता सादर करुन कवितेतून शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील काही घटनांची माहिती सांगून अध्यक्ष समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने, विजयसिंह परदेशी, संतोष बंडेवार, गिरिधर पवार, गणेश गिरे, मारोती सुरणर, मारुती राठोड, वैशाली सपकाळ, सविता गोसावी, आशा साळुंखे, तारामती जाधव, सतिश जावळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन अनिल भांड यांनी तर आभार विजय जाधव यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *