
वाळूजमहानगर, (ता.15) – मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहे. या उपोषणाकडे दुर्लक्ष करून सरकार चालढकल करत आहे. हा वेळकाढूपणा असून जर जरांगे पाटील यांना काही झाले. तर त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल. असा इशारा देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना देण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात त्वरित रूपांतर करावे. या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज (ता.14) रोजी 5 वा दिवस असून जरांगे पाटलाची तबीयत अत्यंत खालावली आहे. असे असतानाही सरकारने 15 तारखेचे अधिवेशन 20 तारखेवर ढकलले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सूडबुद्धीने जाणीवपूर्वक चाल ढकलपणा करत आहे. सरकारचा हा वेळ काढूपणा आहे. सरकारने मराठा समाजचा अंत पाहू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. असे निवेदन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांना बुधवारी (ता.14) रोजी देण्यात आले. या निवेदनावर अर्जुन आदमाने पाटील, अमोल काळे पाटील, विजय सरकटे, कैलास भोकरे, नितिन देशमुख, उमेश दुघाट, प्रवीण दुबिले, संजय कर्पे, चिन्मय जाधव यांच्या सह्या आहेत.
