March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) -बजाजनगर येथील भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था अंतर्गत श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात इंटर इंजिनीअरिंग डिप्लोमा स्टूडट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत कॅरम अँड चेस स्पर्धा उत्साहात झाली.

चेस स्पर्धेत छ्त्रपती संभाजीनगर मधील सी.एस.एम.एस.एस. पॉलिटेक्निक महाविद्यालयमधील मुलींनी व शासकीय पॉलिटेक्निक मुलांनी प्रथम परितोषिक पटकावले. तसेच कॅरम स्पर्धेमध्ये शासकीय पॉलिटेक्निक मुलींनी व शासकीय पॉलिटेक्निक धाराशीव मुलांनी प्रथम परितोषिक पटकावले. इंटर इंजिनीअरिंग डिप्लोमा स्टूडट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी या स्पर्धा घेण्यात येतात. त्या पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील 5 व 6 फेब्रुवारी 2024 विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 32 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या महाविद्यालयामधील सर्व मिळून 500 विद्यार्थ्याने सहभाग नोंदवत स्पर्धेस उपस्थिती दर्शवून बुद्धीला वाव दिला. स्पर्धेत विजेत्या संघाला भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके व कार्यकारी अधिकारी बी. बी. जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *