
वाळुज महानगर, (ता.4,)- पंढरपूर येथे ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांच्यात झालेल्या वादावरून पंढरपूर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. हा तणाव केवळ अफवांमुळे झाल्याने व पुढील काळात शांतता राखली जावी यासाठी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी कॅार्नर बैठका घेऊन नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. 
पंढरपुर येथे रविवारी (ता.4) रोजी दुपारी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य आमेर पठाण यांच्या दोन गटातील झालेल्या वादा संदर्भाने हिंन्दु धर्मिय बांधवांची वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी कॉर्नर बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांना कोणीही अफवांवर विश्वास येऊ नये, तसेच व्हाट्सअप, फेसबुक या सोशल साईडवर वादग्रस्त मजकुर किंवा फोटो व्हिडिओ टाकुन कायदा व सुव्यवस्था घडवणार नाही. असे काही करताना आढळल्यास तांच्यावर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. अशा सुचना या मीटिंगमध्ये देण्यात आल्या. मिटींगला 40 ते 45 नागरिक हजर होते.
