
वाळूजमहानगर, (ता.3) – परभणी जिल्हा मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगरतर्फे रविवारी (ता.4) रोजी बजाजनगर येथे स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, भाजप परभणी लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बजाजनगर येथील वैष्णवीदेवी गार्डन येथे सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रदीप जैस्वाल, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केणेकर, जिल्हा सरचिटणीस अनिल चोरडिया, ज्योतिषचार्य सुनील कुमार महाराज, समर्थ हॉस्पिटलचे डॉ. शहाजी तौर यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी परभणी जिल्हा मित्र मंडळाच्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन मान्यवराच्या हस्ते होईल. यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातून येथे स्थायिक झालेल्या मंडळींनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भानुदासराव ससे पाटील, नवनाथ भगस, अच्युत कदम-बोर्डीकर, डॉ. पंडित क्षीरसागर, मुंजाजी जगाडे, डॉ. ज्ञानेश्वर ससे, शिवाजी इंजे पाटील, विष्णु शिंदे, शेषराव चव्हाण, हनुमान डोंबे, विष्णू वाघ, बाबासाहेब तुरे, डॉ. प्रभाकर आघाव, शरद भगस यांनी केले आहे.
—————-
