March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.1) – ओरिजनल असल्याची भासून हुबेहुब नकल करून बनावट क्लच प्लेट विक्री करण्यासाठी दुकानात ठेऊन ग्राहकांची तसेच कंपनीची फसवणुक करीत असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उघड झाल्याने त्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई 31 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नवी दिल्ली येथील ब्रँड एडी अँड रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ले पार्टस् नाव व लोगोची हुबेहुब नकल क्लच प्लेट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी (ता.31) रोजी सायंकाळी 6.25 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील गणेश ऍटोमोबाईल या दुकानात टाकला. तेथे कृष्णा युवराज आरने (40) रा. सलामपुरेनगर पंढरपुर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर हा काम करत होता. दुकानमालक अभय अशोकचंद छाजेड रा. छत्रपती संभाजीनगर हा बाहेरगावी होता. दुकानात पाहणी केली असता लोखंडी रॅकमध्ये 18 हजार रुपये किमतीच्या 2 बनावट क्लचप्लेट साडपल्या. त्या ऑरिजनल बॉक्समध्ये हुबेहुब नकल करून बनावट असल्याचे उघड झाले. तसेच दुसऱ्या बॉक्स मध्ये इतर कंपन्यांचे क्लचप्लेट टाकलेले होते. पोलिसांनी बनावट मुद्देमाल पंचांसमक्ष सिललाख मोहर लावून सविस्तर पंचनामा केला व तो माल त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर सुनिल वासुदेव गुप्ता (46) व्यवसाय गॅरेज रा. स्वराजनगर, गट नं. 12 वडगांव कोल्हाटी, ता.जि. छत्रपती संभाजीनगर याच्या राजगुप्ता क्लचप्लेट या दुकानात छापा टाकला असता तोही बनावट बलचप्लेट विक्री करत असल्याचे उघड झाले. तेथे 24 हजार रूपये किंमतीच्या ले पार्टस् नाव व लोगो हुबेहुब नकल केलेल्या बनावट क्लचप्लेट आढळुन आल्या.हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी कंपनीच्या वतीने रेवणनाथ विष्णु केकान रा. रामटेकडी, हडपसर, पुणे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अभय अशोकचंद छाजेड व सुनिल वासुदेव गुप्ता यांच्या विरूध्द कॉपीराईट ऍक्ट 1957 चे कलम 51,63 व भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *