March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.22)- अयोध्या येथे आज सोमवारी (ता.22) रोजी श्रीराम मुर्तिप्राणप्रतिष्ठापणा होत आहे.
यानिमित्त बजाजनगर येथील अयोध्यानगर श्रीराममंदीर येथे सकाळी अभिषेक तसेच दुपारी 12 वाजेपासुन अयोध्या येथील लाइव्ह प्रक्षेपण स्र्किवर दाखविले जाणार आहे.

त्याचप्रमाणे सायंकाळी दिपोत्सव साजरा केला जाईल. रात्री 8 वाजता महाआरती व त्यानंतर प्रसादाचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिरात दर्शन आणि प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीराम सेवाभावी संस्था तसेच श्रीराम मित्रमंडळ अयोध्यानगर बजाजनगर छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *