
वाळूजमहानगर, (ता.16) – ‘महिला उद्योजकता विकास सेल’ च्या वतीने मसिआच्या वाळूज येथील कार्यालयात सुदर्श रजनिश कटारीया यांचे प्रशिक्षणपर कार्यशाळा 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.
उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या आणि सक्रीय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी मसिआच्या वतीने उद्योग व्यवसायासाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शनपर शिबिर, यशस्वी महिला उद्योजकांचे रेयर शेयर, अभ्यास दौरे अशा माहितीपर कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला सेलच्या संयोजिका सुनीता राठी, मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील व उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुदर्श कटारीया यांनी महिलांना ध्येय, उद्दिष्ट, डिजिटल व्यक्तिमत्व तयार करणे, लिंकेडचे रहस्य, ए आय आणि डिजिटल टुल्स यावर विस्तृत माहिती दिली. तसेच डिजिटल वापरायचा उद्योग व्यवसायात किती महत्व आहे याचे देखील उदाहरण दिले. आणि डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ‘महिला उद्योजक सुनीता राठी, प्रोजेक्ट लीडर कल्पना काळे व पल्लवी दलाल यांनी नियोजन केलेल्या या कार्यशाळेस राजश्री कुलकर्णी, सारिका किर्दक, आरती पारगावकर, सुलभा थोरात, शीतल काबरा, योगिता तोष्णीवाल, अंजली तोष्णीवाल, शिल्पा काळे, शीतल मोदाणी, मनीषा मंगलगे, अश्विनी थेरे, माधुरी कांबळे, आरती सोनी, कविता गुंड, सुनीता मोगल, दिपका भंडारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल काबरा यांनी केले.
