
वाळूजमहानगर, (ता.1) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी सहयाद्री स्कूलचे संचालक प्रभाकर म्हस्के, संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील त्यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थीनीं मानवी साखळीतील वेल कम 2024 साकारले. गेल्या वर्षाच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला, आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागतपण केले. आणि येणाऱ्या वर्षी चांगले आरोग्य, सुख, समृद्धी, आणि यश मिळो ही प्रार्थना केली. या वर्षी आपण पर्यावरणाचे संगोपन करू, आपल्या सर्व कार्यात आपण यश मिळवू असे नवनवीन संकल्प विद्यार्थ्यांनी ठरवले. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षकांनीही आपल्या सहकारी मित्रांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुवर्णा जोशी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कंन्नावार, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, भाग्यश्री मुळे, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
