
वाळूजमहानगर, (ता.26)-‘महिला उद्योजकता विकास सेल’ च्या माध्यमातून यापूर्वी 1 एस, 2 एस आणि इंडस्ट्रियल 7 लॉस मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. याचाच एक महत्वपूर्ण भाग म्हणून ‘लीन मॅनेजमेंट’ या विषयावर तज्ञ नीलेश सुराणा यांची महितीप्रत कार्यशाळा 23 डिसेंबर 2023 रोजी मसिआच्या वाळूज येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी नीलेश सुराणा यांनी ‘लीन मॅनेजमेंट’ यामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व महत्वपूर्ण बाबींची सविस्तर माहिती विविध उदहरणांद्वारे उपस्थितांना दिली. तसेच या कार्यपद्धतीच्या वापरामुळे आपल्या कंपनीशी संबंधित सर्व आवश्यक गोष्टीत प्रभावी आणि कंपनीच्या फायद्याचे असलेले अॅक्टिविटी वेळ कमी लागेल, आर्थिक बचत होईल, मनुष्यबळाचा योग्य वापर होईल, तसेच सर्व ऑर्डर्स वेळेत पूर्ण करता येतील असे सांगितले. यावेळी विशेषत्वाने ‘विविध उत्पादनासाठी लीन मॅनेजमेंट ची कला’, ‘प्रसिद्ध तसेच उद्योगातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन’ आणि ‘व्यवसायाच्या नवीन संधी ’ या बाबींमध्ये मध्ये चांगला फायदा होतो. असे सुराणा यांनी महिला उद्योजकांना महत्व पटवून दिले. ही कार्यशाळा अत्यंत महत्वपूर्ण तसेच उद्योगाच्या उन्नतीसाठी फायद्याची ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित महिला उद्योजकांनी बोलून दाखवला. या कार्यशाळेसाठी ‘महिला उद्योजकात विकास सेलच्या’ संयोजिका सुनीता राठी यांच्यासोबत प्रोजेक्ट लीडर म्हणून रत्नप्रभा शिंदे, कल्पना काळे, जया पवार, मंगला महाजन, सुलभा थोरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला उद्योजकांमध्ये राजश्री कुलकर्णी, आरती पारगांवकर, जमुना मानधनी ज्योति चिलात्रे, अंजली तोष्णीवाल, आरती सोनी, अपूर्वा भुसारी, पायल नाईकवाड, शीतल काबरा, प्राजक्ता कुलकर्णी, उमा कुलकर्णी, वैशाली पाटील आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता मोगल यांनी केले.
