February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूलची विद्यार्थीनी श्रुतकिर्ती मिनिनाथ खलाटे हीने क्रीडा व यूवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले.

खलाटे हीने प्रथम क्रमांक घेऊन सुवर्णपदक मिळवलेल्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. यापूर्वी श्रुतकिर्तीने राज्यस्तरीय सब जुनिअर ज्युदो स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले होते. बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस विद्यार्थी हे स्पर्धा परी‌‌क्षेबरोबर क्रीडा, नीट, जेईई-(मेन /ऍडव्हान्स ), एनटीएसई, एमटीएसई स्कॉलरशिप, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा अनेक स्पर्धेत यशाचा ठसा उमटवत आहेत.
विद्यार्थीनीच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *