
वाळूजमहानगर, (ता.25) – सिडको वाळुजमहानगर प्रकल्पांतर्गत संपुर्ण देखभाल दुरूस्तीसह विकास कामे केल्याशिवाय सिडकोने वाळुज महानगर प्रकल्पाचे हस्तांतरण करू नये. नसता 26 जानेवारी पासून सिडको कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा निर्णय कृती समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीत रविवारी (ता.24) रोजी एक मताने मंजूर करण्यात आला.

वाळुज परिसरात सिडको प्रशासनाच्या वतीने उभारलेल्या वाळूज महानगर-1, 2, व 4 या नागरी वसाहती निर्माण केल्या. परवडत नाही म्हणून सिडकोने वाळूज महानगर-3 हा प्रकल्प गुंडाळून ठेवला. तसेच निर्माण केलेले नगर -1, 2 व 4 चे हस्तांतरण महानगरपालिकेकडे करण्याचा घाट सुरू आहे. या संदर्भात वाळुजमहानगर बचाव कृती समितीची रविवारी (ता.24) रोजी बैठक झाली. या बैठकीत सिडको वाळुजमहानगर प्रकल्प अंतर्गत देखभाल दुरुस्तीसह विकास कामे मागील 3 ते 4 वर्षापासून होत नाहीत.
मुख्यमंत्री महोदय यांनी 24 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार आजपर्यंत सिडकोकडून काम करण्यात आले नाही. तसेच हा प्रकल्प अपूर्ण असताना संपूर्ण विकास कामे न करता प्रशासनाच्या हस्तांतरण करण्याच्या मनसुबाच्या विरोधात सिडको वाळूज महानगर प्रकल्प 1, 2 व 4 या तीनही नगरातील प्रत्येक सोसायटीतील पदाधिकारी व नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते देखभाल दुरुस्तीसह संपूर्ण विकास कामे झाल्यानंतरच नवीन नगरपालिका बनवून हस्तांतर करावे. हा एक मताने मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. या अनुषंगाने 29 तारखेला वाळूजमहानगर कार्यालय तिसगाव येथे सिडकोचे प्रशासक यांच्यासह संपूर्ण ईतर विभागाचे प्रमुख यांच्यासोबत बैठक करून दैनंदिन देखभाल दुरुस्ती व इतर सोसायटीतील अडीअडचणी मांडण्यात येतील. तसेच 5 जानेवारी रोजी सर्व सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत सर्व पदाधिकारी नागरिक यांच्याकडून प्रशासनास निवेदन देण्यात येईल. निवेदनामध्ये प्रमुख मागणी देखभाल दुरुस्तीसह संपूर्ण रस्ते रिसर्फेसिंग करून सेवा सुविधाचे संपूर्ण भूखंड विकास करावे. त्यानंतरच सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था नव्याने स्थापित करून हस्तांतर करावे. असे निवेदन देण्यात येईल हे निवेदन सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रशासन यांना देण्यात येईल. येत्या 17 ते 18 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण प्रश्न मार्गी लागले नाही. तर 26 जानेवारी 2024 पासून सिडको प्रशासनच्या विरोधात सिडको कार्यालय समोर आंदोलन करण्याचा ठरावही एकमताने घेण्यात आला.
यावेळी सिडको वाळूज महानगर बचाव समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंह यादव, काकासाहेब बुट्टे, सुदाम जाधव, सुरेश कणसे, सचिव मच्छिंद्रनाथ कुंभार, सहसचिव तेजस बडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत चोरडिया, संघटक शितल गंगवाल, कल्पेश शिरसाट, कृष्णा बागुल, गंगाराम मालकर यांच्यासह विविध नागरी सोसायटीतील विलास इंगळे, अशोक कासार, एस एन नागरगोजे, सुधाकर सूर्यवंशी, गणेश चौधरी, हनुमंत रोडे, कल्याण कस्तुरे, सोमनाथ नेमाने, सुशील सावंत, अमोल वाघमारे, अमोल साळुंके, श्रीधर गेंदाळे, गोविंद पात्रे, प्रदीप पाटील, संतोष महाजन, राजेंद्र देव्हारे, योगेश थोरे, एस पी कोल्हे, जगदीश उगले, सतीश बोरसे, विशाल पवार, संजय बोरगे, लांडे बबन, कृष्णा धोत्रे, अनिल वाघ, राम राऊत, प्रदीप पाटील, अतुल मार्कंडे, विशाल मुंडे, दयालसिंग, प्रेम जाधव, संतोष देशमुख, दिनेश कोळी, उमेश नाईकवाडे, किरण थोटे, एम पी पवार, वैजनाथ गडलिंग, उबाळे ज्ञानेश्वर, एस,एम साठे, प्रशांत सोनवणे, नारायण वायाळ, पुरुषोत्तम सोनवणे, रोहिदास माने, महेश वाघ, अविनाश म्हस्के, अविनाश निकम, अशोक देहाडे, अशोक दारुंटे, सुनील साळुंखे, अर्जुन चव्हाण, रमेश कंटाळी, नारायण शेजुळ, संभाजी भोसले, संजय महाजन, अभिषेक जयस्वाल, संदीप ईनामके, संजय दारूवाले, गंगावणे सुधीर, नवनाथ जोशी, मंगेश बालाजी दबडे, विशाल जाधव आदींची उपस्थिती होती.
