
वाळूजमहानगर, (ता.9) – वाळूज महानगर परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच उच्चभ्रू वसाहतीत अवैधरित्या कॉफी कॅफे बोकाळले आहे. परिणामी पळून जाणे, विनयभंग, छेडछाड, अपहरण तसेच बलात्कारासारख्या प्रकारातही वाढ होत आहे. हिंदू संस्कृतीचा ऱ्हास करत अनैतिक प्रकाराला खतपाणी घालून पाश्चिमात्य संस्कृतीला पोषक ठरणाऱ्या कॉफी कॅफे हाऊस तात्काळ बंद करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक संघटना कडून केल्या जात आहे.
गेल्या आठ दहा वर्षात वाळूज महानगर झपाट्याने प्रगती करत आहे. त्याच बरोबर कॅफे कल्चर सारख्या गंभीर स्वरुपाच्या प्रकारातही वाढ होत आहेत. शाळा, कॉलेजच्या बाजूला किंवा उच्चभ्रू वसाहतीच्या बाजूला प्रयवसी म्हणून अनेक कॉफी कॅफे कॉलेजच्या मुला, मुलींना खासगी कंपार्टमेंट किंवा काळी काच असलेले ठिकाण उपलब्ध करून देत असल्यामुळे अनैतिक प्रकाराला वाव मिळत आहे. वर्दळीच्या ठिकाणी जसे की महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी चौक, कोलगेट चौक, मोरे चौक, जय भवानी चौक, सिडको वाळूजमहानगर येथील कॅफेच्या ठिकाणी मुलेमुली अभ्यासाच्या नावाखाली नसेली पदार्थ सेवन करून नको ते चाळे करताना दिसून येत आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती नष्ट होत असून पाश्चिमात्य संस्कृती वाढीस लागत आहे. विनयभंग,अपहरण, छेडछाड तसेच बलात्कारासारख्या घटनांना पाठबळ मिळत आहे.

— यांनी केली होती मागणी —
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष अर्जुन आदमाने पाटील व अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मोरे, मनोहर सनेर, वाळूजमहानगर अध्यक्ष राजेश इंगोले, नारायण मातकर, रविंद्र मार्कंडे, बाळासाहेब खंडाळे, बापू पाटील, सागर देवबोने यांच्या वतीने निवेदन देऊन अवैध कॅफे तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी केली होती.
— निवेदन मिळताच कारवाई —
वाळुज एमआयडीसी पोलीसांना दिलेले हे निवेदन मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, मपोउपनि. स्वाती उचित, पोना. संदीप गाडगे, पोअ संजय पवार, प्रशांत सोनवणे, महिला पोलीस अंमलदार प्रियंका तळवंदे आदींच्या पथकाने शनिवारी (ता.9) रोजी वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणी कॉफी कॅफेवर छापे टाकले.
या छाप्यात महाराणा प्रताप चौकातील कॅफे मार्क 30 व कॅफे डार्क लाईट या दोन कॉफीकॅफे मध्ये तीन जोडपे विक्षिप्त चाळे करताना मिळून आले. याप्रकरणी तीन जोडप्यांसह डार्क लाईट कँफे सेंटरचा मालक नचिकेत वाळु लिंबोटे, कॅफे मार्क 30चा मालक शुभम गजानन कानेकर यांच्यावर कलम 110 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली.
