वाळूजमहानगर, (ता.9) – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रा. सुनील सोनवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन बुधवारी (ता.6) रोजी करण्यात आले होते.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज धबडगे होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सुनिल सोनवणे यांनी व्याख्यानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा व संविधान निर्मिती प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उप-प्राचार्य डॉ. संजय सांभाळकर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मंच्छिद्र सवाई यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करून आभार मानले.
