February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – इंडस्ट्रियल सप्लायर्सच्या दुकानाचे
शटर फोडून विद्युत पंप, मोबाईल, व साहित्य चोरी करणारे 7 आरोपी अटक करून चोरीच्या गुन्ह्यातील 5 लाख 11 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी (ता.1) रोजी जप्त केला.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चांगदेव सोमीनाथ तांदळे वय 53, यांच्या रविकिरण इंटरप्रायजेस,या इंडस्ट्रियल सप्लायर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपनीच्या विद्युत मोटार व स्पेअर पार्ट, दोन मोबाईल मिळून 10 लाख 30 हजार रूपयाचा माल चोरून नेला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चांगदेव तांदळे यांच्या फिर्यादीवरून कलम 461, 380, 34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या

गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून आरोपी शेख शाकेर शेख रज्जाक वय 25, रा. गफुरवस्ती, जुना मोंढा. छत्रपती संभाजीनगर, सादीकखान तुराफखान वय 24, रा. शबनम मस्जिदच्या बाजूला जुना मोंढा छत्रपती संभाजीनगर सरफराजखान वाजीदखान वय 21, रा. लक्ष्मण चावडी छत्रपती संभाजीनगर, अशोक राजेभाऊ खंदारे वय 23, रा. गंगोत्रीपार्क वडगांव (कोल्हाटी), ता.जि.छत्रपती संभजीनगर यांना विचारपुस करून पॉलिसी खाक्या दाखवला. त्यामुळे त्यांनी चोरीतील मुद्देमाल आरोपी उमेर रऊफ कुरेशी वय 20, रा. चित्तेगांव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, जावेदखान सरदारखान वय 41, रा. कैसर कॉलनी लँड नं. 4 निजामोद्दीन दर्ग्या समोर, छत्रपती संभाजीनगर यांना विक्री केल्याचे सांगितले. हा मुद्देमाल खरेदी करणारे जुनेद व निसार हे फरार आहे. अटक केलेल्या आरोपींसह एका विधी संघर्ष बालक रा. क्रांतीनगर वडगाव (कोल्हाटी), छत्रपती संभाजीनगर याच्याकडून एकुण 5 लाख 11 हजार पाच रुपये किंमतीचे दोन मोबाईल, मोटार पंप, स्पेअर पार्ट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई  –

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नितिन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे, पुंडलिक डाके, पोलीस हवालदार धिरज काबलीये, संदिप गाडगे, सतवंत सोहळे, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, हनुमान ठोके, सुरेश कचे, राजाभाऊ कोल्हे, बाळू लहरे, बाळासाहेब देवबोने यांनी केली.

खरेदी करणारे फरार

या चोरीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला ऐवज खरेदी करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्या ताब्यातील पाच लाख एकोणावीस हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करणे बाकी असल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *