March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – बजाजनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, माजी सरपंच महेश भोंडवे तसेच सिद्धिविनायक गणेश मंदिर, पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित निशुल्क योग प्राणायम शिबीराची सांगता बुधवारी (ता.29) रोजी मोठ्या उत्साहात झाली.

यावेळी आमदार संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट, सरपंच सुनील काळे, शिवसेना तालुका प्रमुख हनुमान भोंडवे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुबंईचे प्रविण बांदकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात मुंबई येथील योग मार्गदर्शक प्रसाद महामुणकर, श्रुती शिंदे, गायत्री शेटे यांनी विविध प्रकारचे योगाचे प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी पंतजली योग समितीच्या मंजूषा शुक्ल, मोना राजपूत, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लगड, मीनाक्षी भोंडवे, अधिक पाटील, अनिल पाटील, विजय उखळे, राजेंद्र माने, पंडीत नवले, लक्ष्मण शिंदे, गोरख शेळके, स्व. भैरोमल तनवानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, प्रदीप माळी, रोहित खैरे, विशाल लगड, अर्जुन चेळेकर, रामेश्वर धनायत, राजकुमार गारडे, गणेश भोंडवे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनार्दन नावसरे, अंकुश भानुसे, संतोष राजपूत, कल्याण तवले. सूर्यकांत सनस, प्रकाश कदम, अनिता धनाई, स्वाती पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक पाटील यांनी तर आभार शिवसेना तालुका प्रमुख हनुमान भोंडवे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *