
वाळूज महानगर, (ता.2) – वडगाव (को.) येथील आनंद बुद्ध विहार येथे 1 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या वर्षावासानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध व त्यांचा धम्म या पवित्र धर्मग्रंथाचे वाचन, भव्य धम्म पदयात्रा व कठीण चिवरदानाने वर्षवास समाप्ती समारोह 29 ऑक्टोबर रोजी झाला. 
यावेळी सकाळच्या सत्रामध्ये पूज्य भदन्त सुदत्तबोधी महाथेरो, सरपंच सुनील काळे, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा साळे, रमेश बागूल, किसन आहिरे, विनोद चौधरी, विजय गायकवाड, विकास गायकवाड, रमेश दाभाडे, आनंद गोरडे, देवानंद सावंत, नामदेव गायकवाड, नामदेव केदारे, एस पी हिवराळे, अशोक निकम आदींची उपस्थितीमध्ये धम्मध्वजारोहण, धम्म ध्वज, बोधीवृक्ष व उपस्थित भिक्खू संघाला मानवंदना देण्यात आली. यावेळी बुद्ध रुपाचे रथाद्वारे संपूर्ण परिसरामध्ये पंचशील ध्वज, धम्म पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला भदंत सुदत्तबोधी महाथेरो, अश्वजीत भन्ते (बुद्धगया) यांनी धम्मपद यात्रेला ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचे समाप्ती आनंद बुद्ध विहार येथील बुद्धरुपाजवळ करण्यात आली. यावेळी भदन्त अश्वजित यांनी पवित्र बुद्ध, धम्म, संघ व जीवन जगण्याचा मार्ग या पवित्र ग्रंथावर धम्मदेसना दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, भीमराव हत्तीअंबीरे, राजन लाड, सिद्धार्थ बनकर, रविकुमार वसाटे, रामचंद्र पठारे, विनोद अवसरमल, विलास पठारे, व्ही.के जाधव, चेतन इंगोले, सिध्दार्थ दिपके, एल. ए. कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रंथ वाचक गौतम पाईकराव, मच्छींद्र उबाळे, छायाबाई पाईकराव, वंदनाताई सावतकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सांयकाळच्या सत्रात गायक कुणालभाऊ वराळे निर्मित युगपुरुष बुद्ध-भीमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रविण नितनवरे, संतोष लाठे, विनोद अवसरमल, नामदेव सावते, काकासाहेब कोळसे, प्रविण वाघमारे, अंजन साळवे कैलास साळवे, नितीन शेजवळ, खुशालराव बनसोडे, विनोद चौधरी, बाबासाहेब आहिरे, जे. के. आमराव, ज्ञानेश्वर जाधव, शालिक वाहूळ, नरेंद्र त्रिभुवन, पांडूरंग झडते, सिद्धार्थ दळवी, माणिक जोगदंडे, हनुमंत भवरे हे उपस्थित होते. यावेळी परिसरातील उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कौशल्याबाई निकम, कलाबाई साळवे, लोखंडे, रमेश निकम, सुमीत मांदळे, श्रावण खरात, जगन्नाथ निकम, अजय चौथमल, कमलबाई गायकवाड, द्वारकाबाई नरवडे, विमल दळवी, शारदा पाईकराव, पुष्पा चौथमल, शंकर खरात, भगवान नरवडे, मगन निकम, स्वप्नील खरात, भगवंतराव निकम, विशाल रुपेकर, अक्षय परकारे, शांतीलाल दिवेकर, अविनाश परकारे, वैभव पगारे, बाळू शेरे, शंकर शेळके, अलका सुरडकर, मुवुंâद जोगदंडे, राजेश काळे, इश्वर लोखंडे, रवी लोंढे, अशोक किर्तीकर, देविदास परकारे, विनायक साळवे, विनायक रणयेवले, भाऊसाहेब बनकर, विनायक जाधव, दत्तात्रय शेजवळ, सुरेश क्षीरसागर, माणिक वाहूळ, रामा कांबळे, सुनील जोगदंडे, विक्रम पठारे, सुरेश नरवडे, अनिल जाधव, लक्ष्मण परकारे, भाऊसाहेब नरवाडे, अजय जाधव, गौतम सरवदे, पांडूरंग झडते, विश्वनाथ झाल्टे आदींनी श्रमदान केले.
आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
—————-
