February 5, 2026

लिंबेजळगांव, (ता.17) – विहीरीत पडल्याने एका 55 वर्षीय महीलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हीं घटना सोमवारी (ता.16) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळूज पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कदीम शहापूर येथे घडली. 

याबाबत पोलीसांनी सांगितले की, शांताबाई निवृत्ती चापे (55) रा. कलीम शहापूर ता. गंगापूर ही महिला शेतात दुपारी जेवण करायचे असल्याने विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पाय घसरल्याने त्या विहीरीत पडली. नागरीकांनी घटनेची माहिती वाळूज पोलीसांना दिली, पोलीसांनी घटनास्थळ जवळ करुन नागरीकांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय अपघात विभाग घाटीत दाखल केला. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी 5.45 वाजता तपासून मयत घोषीत केले.
या प्रकरणी घाटीतुन आलेल्या माहीतीवरुन वाळुज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुखदेव भागडे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *