February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.3) – राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेला बिल्डर आणि नागरिकांमध्ये रस्त्यावरून झालेल्या वादात महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता.2) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील पंचगंगा हौसिंग सोसायटीमध्ये घडली. या घटनेत एका मुली सह 3 महिला जखमी झाल्या. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा संतप्त जमाव जमला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतली. दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील पंचगंगा हौसिंग सोसायटी शेजारील भूखंड भाजपाचा पदाधिकारी असलेल्या दौलतखा पठाण यांनी डेव्हलपसाठी घेतला आहे. तेथे रस्त्याचे सुरु आहे. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता सोसायटीचा आहे. तर आरोपीच्या म्हणण्यानुसार नागरिकांनी येथे अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामावरून वाद सुरू आहे. या रस्त्यावर कामासाठी मुरूम व खडी आणून टाकली आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना येणे जाणे करिता अडथळा निर्माण होत आहे. म्हणून सोसायटीतील नागरीकांनी तेथील मुरूम, डब्बर काढून बाजूला टाकल्याने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दौलतखान पठाण हे आमेर पठाण, निलोफर पठाण, रुबीना हुसेन सैय्यद या नातेवाईकांसह सोसायटीत आले. व जोरजोरात ओरडुन, आरडाओरडा करुन शिवीगाळ करीत होते.

त्यावरुन सोसयाटीतील सर्व नागरीक घराबाहेर आले व त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता दौलतखान पठाण याने काहीएक ऐकुन न घेता सोसायटीतील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सोडवण्यासाठी आलेल्या महिलांना दौलतखान यांचा मुलगा आमेर खान याने महिला व मुलींला हाताचापटाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी दोन महिलांनी सोसायटीतील महिलांचे केस ओडुन हाताचापटाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून आम्ही तुम्हाला पाहुन घेऊ अशी धमकी दिली.

यावेळी झालेल्या मारहाणीत कमलबाई बाळू नलावडे, अंजली कुलकर्णी, वनिता पवार व समीक्षा नलावडे अशा चार महिला जखमी झाल्या. यावेळी सोसायटीतील इतर लोक जमा झाल्याने दौलतखा पठाण व त्याचे नातेवाईक त्या ठिकाणाहुन निघुन गेले. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा संतप्त जमाव जमला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या संतप्त जमावाने आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.

या प्रकरणी कमल बाळू नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पंचगंगा हाऊसिंग सोसायटीला भेट देऊन मारहाण झालेल्या महिलांची विचारपूस केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *