
वाळूज महानगर, (ता.23) – लहान मुलांच्या भांडणावरून चार जणांनी संगणमत करून एका महिलेला व तिच्या मुलास मारहाण करून तिचा शुक्रवारी (ता.22) रोजी राजी 7:30 वाजेच्या सुमारास विनयभंग केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र एक जण फरार आहे. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील आरोपी सिकंदर पठाण, दानिश राजु कुरेशी, कैंसर गणी सय्यद व अश्पाक मुसा सय्यद यांनी
शुक्रवारी (ता.22) रोजी राजी 7:30 वाजेच्या सुमारास संगणमत करून लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी महिला व तीच्या मुलास मारहाण करून फिर्यादी यांच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच तीचा मुलगा महेश याला प्लॅस्टीकच्या बकीटने पाठीवर, तोडावर व डोळ्यावर मारून जखमी केले. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. मात्र एक फरार असून त्याचा शोध चालू आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. सचिन डाके आहे.
