
वाळूज महानगर, (ता.19) – बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही के जाधव होत्या. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास घायवट, उपमुख्याध्यापक इलियास पठाण, बीजी गायकवाड, राजन सोमासे, शिवाजी जाधव, अनिल पाटील, ज्योती बोडके, प्रवीण राजे, संगीता हिवर्डे, वैशाली चाफे, राजपूत मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी के जाधव यांनी केले. तर आभार राजेंद्र घटकर यांनी मानले.
