
वाळूज महानगर, (ता.19) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल व श्री गजानन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव दिन रविवारी (ता.17) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हनुमान जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. 
प्रथम दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, हनुमंत जाधव, भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रतिज्ञा वाचन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा नवथर तर आभार गुलाब मोहिते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहाजी मंगनाळे, कल्याण कुलकर्णी, अशोक तारडे, संदीप हिंगणकर, संजय तुपे, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, स्वाती सूर्यवंशी, गणेश शिरसाठ, निलेश पाटील, दीपक कोळी, दीपक पठारे, गोरवाडकर, सुभाष जाधव, पूजा गिरी, जब्बार पठाण, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले.
