March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.18) – भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था अंतर्गत श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ) दीक्षांत समारंभ व विद्यार्थी मेळावा रविवारी (ता.17) रोजी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी मान्यवऱ्यांच्या उपस्थितीत 103 विद्यार्थाना पदवी प्रदान करण्यात आली. 

कार्यक्रमाला मायलन लॅबोरेटरीचे गुणवत्तेचे प्रमुख सहयोगी उपाध्यक्ष सयाजी पाटील व त्यांच्या पत्नी कविता पाटील हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यानी समाज आणि देशाच्या विकासात हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मासिचे बरेचशे विद्यार्थी चांगल्या औद्योगिक व शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. तर बरेचशे विद्यार्थी हे उच्चशिक्षण घेत आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके व कार्यकारी अधिकारी बी. बी. जाधव यांनी सर्व पदवीधर विद्यर्थ्यांचे कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *