March 25, 2026

वाळूज महानगर, (ता.17) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूलमध्ये “हिंदी दिवस “मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना हिंदी आपली राष्ट्रभाषा असून भारतामध्ये सर्वत्र बोलली जाते. हिंदी ही भाषा सामान्यातील सामान्य लोकांना सुद्धा कळते. हिंदी भाषेमुळे आपण भारतामध्ये कुठेही निवास करू शकतो.

यावेळी शाळेतील हिंदी विषय शिक्षक हनुमान जाधव यांनी हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून “राष्ट्रभाषा हिंदी ” विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनीही हिंदी भाषा विषयी विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिकचे मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट, प्राथमिकच्या रेखा बिदरकर, हनुमान जाधव, निलेश मिसाळ, प्रीती नरवडे, दीप्ती झाडे, सोनी कुमारी, लता वैष्णव, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, ममता खोतकर, हर्षदा भुम्बे, हनुमान जाधव, अर्चना बुर्जे, अस्मिता तायडे, विजया पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन रेखा बिदरकर यांनी केले तर आभार दीप्ती झाडे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *