March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.14) – न्यू शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव (शेणपुंजी) येथे मुख्याध्यापिका भारती साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आजीआजोबा दिवसाचे आगळे वेगळे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण जाधव महाराज व अनुसयाबाई वाघिले यांची उपस्थिती होती. प्रथम शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजी आजोबांसाठी उखाणे घेणे, संगीत खुर्ची, गोष्ट सांगणे अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके होत्या. खरंतर आजच्या धावपळीच्या युगात आणि विभक्त कुटुंब पद्धतीत नातवांना आजीआजोबा यांचा जास्त सहवास मिळत नाही. परंतु अशाही परिस्थितीत ज्याही विद्यार्थ्यांचे आजीआजोबा त्यांच्या सोबत राहतात ते सर्व मोठ्या उत्साहाने शाळेत आले होते. यावेळी वयाचे 60-65 वर्ष पेक्षाही जास्त असलेले आजी आजोबा अगदी चिमुकल्यांसारखे धावताना बघायला मिळाले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तो म्हणजे म्हातारपणात बालपण अनुभवायला मिळाल्याचा.
यावेळी संगीत खुर्ची स्पर्धेत आजोबा गटातून नामदेव भोकन यांनी प्रथम तर सुभाष पाटील यांनी द्वितीय क्रमांक तसेच आजी गटातून त्रिवेणी गडदे यांनी प्रथम तर जिजाबाई दुशिंग यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. उखाणे स्पर्धेत ठगनाबाई उबाळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्या सर्व स्पर्धकांना शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत शिनगारे, प्रास्ताविक जगदीश दिघे यांनी तर आभार आप्पासाहेब मिसाळ यांनी मानले. सामूहिक नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *