March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.13) – अंकुर शिक्षण संस्था संचालित सिडको महानगर 1 येथील किड्स कॅम्ब्रिज स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा राबविण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनविण्यासाठी सर्व विद्यार्थी शाडू माती घेऊन आले होते. शाळेच्या पटांगणामध्ये ही कार्यशाळा झाली. पर्यावरणास पूरक असा शाडू मातीचा गणपती केल्याने निसर्गाचे प्रदूषण होत नाही, या मूर्तीच्या मातीचा आपण पुन्हा वापर करू शकतो, पुन्हा मूर्ती तयार करण्यासाठी वापरू शकतो, या मध्ये कोणतेही प्रदूषण होत नाही, आणि हेच मुलांना समजावे म्हणून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के यांनी मुलांना सोप्या पद्धतीने गणपती कसा तयार करायचा याचे मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळेत मुलांनी सुंदर व सुबक गणपती बाप्पा तयार केले, प्रत्येक मुलाच्या अंगी एक कला असते आणि त्या कलेच्या आणि कल्पनेच्या आधारे मुलांनी अप्रतिम अश्या गणेश मूर्ती तयार केल्या. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रूपाली उपळकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कंन्नावार , सुवर्णा कदम, भाग्यश्री मूळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरिता डावखर, राणी कांबळे, सरला रोडगे, सई राणे, कुणाल शिंदे यांचे सहकार्य लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *