
वाळूज महानगर, (ता.9) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विदयार्थ्यासाठी उद्योजकता आणि उद्योजकता विकास (बीवायएसटी) या विषयी कार्यशाळेचे आयोजन गुरुवारी (ता.7) रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेबदल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव साहेब यांनी कौतुक केले. 
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे समन्वयक अजय पाटील व जिग्नेश शत्राळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन उद्योजकता आणि उद्योजकता विकास या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच त्यांनी उद्योजकीय मानसिकता, कल्पनेपासून स्टार्टअपपर्यंत निधी, वित्तपुरवठा, नेटवर्किंग आणि संसाधने, उद्योजकांसमोरील सामान्य आव्हाने आणि विविध क्षेत्रातील यशोगाथा यावर चर्चा केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात न लागता स्वतःचा व्यवसाय उभारून उद्योजक बनावे, तसेच जिग्नेश शत्राळकर यांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट विषयी माहिती सांगितली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, अभियांत्रिकी क्षेत्रात नावीन्य सर्जनशीलता आणि उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमास हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभाग प्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. प्रताप मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पिंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर, व महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भावना पिंगळे, प्रा. स्मिता खाजेकर आणि महाविद्यालयांच्या इनोव्हेशन कौन्सिल सेलच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
