March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.7) – रांजणगाव ( शे.पू.) येथील बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूलमध्ये “कृष्ण जन्माष्टमीचा” कार्यक्रम गुरुवारी (ता.7) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्माष्टमी निमित्त छोट्या छोट्या मुलांनी श्रीकृष्ण आणि राधा यांची वेशभूषा करून कार्यक्रमाला आणखी शोभा आणली. मुलांनी दहीहंडी फोडली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री जाधव म्हणाले की, श्रीकृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता की, जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता, लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते, सर्वत्र वाईट गोष्टी होत्या. तेव्हा श्रीकृष्णाच्या रूपातून लोकांचा होणारा छळ थांबू लागला. लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी शाळेतील बाळ गोपळांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिकचे मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट प्राथमिकचे रेखा बिदरकर, हनुमान जाधव, निलेश मिसाळ, प्रीती नरवडे, दीप्ती झाडे, सोनी कुमारी, लता वैष्णव, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, ममता खोतकर, हर्षदा भुम्बे, हनुमान जाधव, अर्चना भुर्जे, अस्मिता तायडे, विजया पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन रेखा बिदरकर यांनी केले. आभार पूजा खोतकर यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *