March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.1) – ” चला निसर्गाशी नाते जोडू या ” असा संदेश देत तिसगाव येथील पोदार इंग्लिश स्कूलच्या मुलांमुलींनी सुंदर राख्या बनविल्या. व त्या बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.

या निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे आणि आपल्याला या निसर्गसाठी काहीतरी केले पाहिजे. अशी भावना ठेऊन मुलांनी शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांना राख्या बांधल्या. आपलं निसर्गाशी असलेलं नातं त्यामुळे त्याचे जतन करण्याची शपथ यावेळी चिमुकल्या मुलांनी घेतली. अशा अनोख्या रक्षाबंधनामुळे नक्कीच मुलांमध्ये निसर्ग वाचवा. अशी जागरूकता निर्माण होईल आणि येणाऱ्या पिढीसाठी ही सुष्टी नक्कीच निरोगी ग्रह होईल यासाठी शाळेचे प्राचार्य लुईस रॉड्रीग्ज, मुख्याधापिका मीनाक्षी कडू आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *