
वाळूज महानगर, (ता.1) – श्रावण महिना आला की सणांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे सगळीकडे वातावरण जसे खुलून आलेले असते. अशा या आनंदमय श्रावण महिन्यात हरियाली तिज निमित्त श्री माहेश्वरी महिला मंडळ वाळूज प्रभागद्वारे तीज शिंजारा उत्सव मोठ्या उत्साहात हॉटेल ओपल प्लाझा मोरे चौक येथे साजरा करण्यात आला. 
यावेळी विविध राजस्थानी नृत्य, सास बहू प्रतियोगिता, पिंडा डेकोरेशन आदी स्पर्धेत सहभाग घेऊन महिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. शितल काबरा, निकिता सोनी, नेहा मुंदडा यांनी विविध मनोरंजनात्मक गेम घेऊन चांगली धमाल उडविली. प्रमिला दरक यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले. प्रथम प्रमुख पाहुणे कुसुम सोनी यांचे स्वागत करण्यात येऊन विजया काबरा, उमा भन्साळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन रचना मालपाणी, भारती राठी, शीतल तोष्णीवाल, नीता लाहोटी, शितल मोदानी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पाडला.
