March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.25) – वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (आयसीम) महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ व 7 दिवसीय इंडक्शन प्रोग्राम घेण्यात आला. यात संपुर्ण शैक्षणिक वर्षाची रूपरेषा, तांत्रिक व कौशल्ययुक्त अभ्यासक्रम, विविध औद्योगिक व सामाजिक उपक्रम, इंडस्ट्रीयल व्हिजीट्स आदी विषयांची सविस्तर माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


आठवडाभर चाललेल्या या इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत दररोज दोन तंज्ञांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यात डाॅ. आर. एस. जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, डाॅ. सी. एस. पद्मावत यांनी विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता विकास, डाॅ. हेमंत जाधव यांनी ॲकॅडमिक एक्सलन्स, डाॅ. गौतम शहा यांनी व्यापक जागतिक दृष्टिकोन, डाॅ.दीपमाला बिरादार यांनी गोल सेटिंग, डाॅ. संभाजी पाटील यांनी युथ व सोशल मिडीया, प्रा. सायली राठोड यांनी वैश्विक मानवीय मुल्य, प्रा. पुजा जैस्वाल यांनी तणावमुक्त कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी एन्ट्री लेव्हल मार्क्स व बेसिक सायन्स यावर आधारित सर्वांची “सेल्फ इव्हॅलूशन टेस्ट” घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आयसीमचे अध्यक्ष डॉ. सुभाष झवर, सचिव दिलीप सारडा, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार, विश्वस्त डॉ. कल्पना झवर, प्रा. आनंद हुंबे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मंगल काळे, सुत्रसंचलन प्रा. सायली राठोड व आभार प्रा. शालिनी तरवडे यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *