
वाळूज महानगर, (ता.24) – लग्नानंतर काही दिवसांनी पती, सासरा व सासू यांनी संगणमत करून 22 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून शिवीगाळ, मारहाण व माहेरहून पैसे आण. असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या तिघांविरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतीक्षा गौरव जैन, वय 22, रा. टी. एल 173, म्हाडा कॉलनी, पारिजातनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर या महिलेचे लग्न 22 मार्च 2023 रोजी गौरव प्रभात जैन, वय 24, रा. एसआरपी कॅम्प, सुरतपास ता. जि. धुळे याच्यासोबत झाले. यावेळी गौरव जैन याच्या परिवारास भांडे, सोन्याची चैन, अंगठी देऊन लग्नाचा खर्च केला होता. ती गौरव यांचे घरी राहणास गेली त्यावेळी घरात सासरे प्रभात हिरालाल जैन, वय 65, सासु दिपाली जैन वय 45, असे राहण्यास होते. काही दिवसच घरातील सर्वजण तिच्यासोबत चांगले वागले. परंतु त्यानंतर 13 एप्रिल 2023 रोजी गौरव यांनी माहेसुन घर बांधण्यासाठी पैसे आणावेत यासाठी दबाव आणुन तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच लग्नानंतर गौरवने एकदाही तिच्यासोबत शारिरीक संबंध केले नाही, प्रेमाने बोलला नाही. परंतु काही दिवसाने सर्व चांगले होईल, या आशेने ती सर्व सहन करत राहीली. दरम्यान सासू, सासरे व नवरा यांनी दबाव आणुन माहेरघर पैसे आणवेत यासाठी तिला मारहाण करून शिवीगाळ करू लागले तसेच तुझे बाहेर अफेअर आहे, तु आमच्या घरात राहण्याच्या तावकीची नाही. असे बोलून घरातच कोडुन ठेवणे, शेजारच्या लोकांशी कोणताही संबंध न घराबाहेर कामासाठी जाऊ न देणे असे वागुन तिला सतत शारिरीक व मानसीक त्रास देत असे. हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्रात गेले, मात्र तिथेही त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे त्यामुळे प्रतिक्षा हिच्या फिर्यादीवरून पती, सासू व सासरा यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 498-1, 323, 504, 506, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
