March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.22) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अंदर बहर नावाचा जुगार खेळताना सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 59 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (ता.21) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कमळापूर फाट्यावर करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथे पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. कमळापूर फाटा येथे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर सोमवारी (ता.21) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे सहा जुगारी पत्ते खेळत होते. त्यापैकी बदक छाप पिवळ्या रंगाची 40 पत्ते फारुक शहा याचे हातात व 12 पत्ते तसेच 250 रुपये होते. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता देवानंद अशोक खिल्लारे याच्याकडे 100 रुपये व रेड मी कंपनी मोबाईल, विनोद कडु सुरसे याच्याकडे 100 रुपये व मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल, भानुदास तुळशीराम डुकरे याच्याकडे 200 रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल, डोंगरसिंग थावरु राठोड याच्याकडे 200 रुपये व रेड मी कंपनीचा मोबाईल, फारुख इस्राईल शहाकडे 200 रुपये असा एकुण 59 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुरजकुमार अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *