March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.21) – ग्रामपंचायतने वाळुज येथील वाघ गल्लीत राखून ठेवलेल्या जागेवर अज्ञात आरोपींनी पुतळा बसविला. सोमवारी (ता.21) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकारानंतर अज्ञात आरोपी विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी ग्रामपंचायत वाळुज यांनी वाघ गल्लीत जागा राखून ठेवली होती. या राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विनापरवाना बेकायदेशीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी उत्तम चांगदेव भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *