
वाळूज महानगर, (ता.2) – श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पुं.) येथे स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 102 वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती शनिवारी (ता.1) रोजी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून पर्यवेक्षिका सरोज पवार उपस्थित होत्या. 
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमने होऊन लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे, मातोश्री मुक्ताई, दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी भाषणे झाली. तर ज्येष्ठ शिक्षिका वैशाली सपकाळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. शाहिरी कादंबऱ्या, कथा यातून अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. अनिल भांड यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घटनांचा सविस्तर उल्लेख करून त्यांचा स्वातंत्र्य लढा, चतूर्सुत्री, होमरुळ चळवळ, शैक्षणिक संस्थेची स्थापना, 1880 साली इंग्रजी शाळेची स्थापना केल्याची माहिती दिली. तसेच केसरी व मराठा वृत्तपत्राची स्थापना करून जनतेपर्यंत स्वातंत्र्यलढा पोचवण्याचे कार्य केले. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सहकारी (लाल,बाल,पाल) यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोक साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना देऊन अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता गोसावी यांनी तर आभार रमा आडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने, भगवान वनारसे, सुरेश घोरबांड, विजयसिंह परदेशी, आशा साळुंखे, ज्योती भालेराव, तारामती हावरगे, सतीश जावळे, गणेश गिरे, मारुती सुरनर, महेश नागेश्वर, ज्ञानेश्वर कौशल्य, काळेश्वर भुरे, प्रल्हाद राठोड आदीची उपस्थिती होती राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
