
वाळूज महानगर, (ता.1) – विद्याभारती प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी या शाळेत अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त मंगळवारी (ता.1) रोजी भव्य पोस्टर प्रदर्शन व वर्ग सजावट उपक्रम घेण्यात आला. यामध्ये इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी हीरीरिने सहभाग घेतला.

यावेळी निसर्ग चित्र, भित्तीचित्र असे वेगवेगळे चित्र भिंतीवर लावण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत व परिचय करण्यात आला. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक समीर पठाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक तथा संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब हरकळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शहीद भगतसिंह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे, सचिव हषि॔द हरकळ, सुधीर देसले, ज्योतीताई देसले, पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब हरकळ यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली व वर्गात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
