March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.31) – रस्त्याने फोनवर बोलत जात असताना दोन आरोपींनी 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. यातील आरोपींचा शोध घेऊन मोबाईल जप्त करून सबळ पुरावा सादर केल्याने त्यांना न्यायालयाने 5 महिण्याचा कारावास (कैद) व प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाल बाळासाहेब उदार रा. पंचमुखी महादेव मंदीराजवळ बजाजनगर हा 19 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास मोहटादेवी मंदीर ते हायटेक कॉलेज दरम्यान रोडवरून फोनवर बोलत पायी जात असतांना आरोपी मदन प्रकाश दुधमोगरे (21) रा. पवननगर रांजनगांव (शे.पु.) व लखन गजानन ढोके (19) रा. कमळापूर, यांनी विशाल उदार यांचा 7000 रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला होता. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 392 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोउपनि संदीप शिंदे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातून मोबाईल जप्त केला. त्यानंतर तपासात आरोपीविरुध्द सबळ पुरावा गोळा करून न्यायालय श्रीमती एस. एस. घोडके प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट 22 वे औरंगाबाद यांचे न्यायालयाने आरोपी विरुध्द खटला चालवला. या खटल्यात आरोपी मदन प्रकाश दुधमोगरे व लखन गजानन ढोके यांना 5 महिण्याचा कारावास व प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *